Kangana Ranaut | बीएमसीच्या कारवाईवर कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेचे कर्मचारी सकाळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर धडकले. सुमारे दीड-दोन तास तोडकाम केल्यानंतर महापालिकेने कारवाई थांबवली. या तोडकामाविरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडक काम तूर्तास थांबवलं आहे. मग तोडकाम करण्यासाठी कार्यालयात गेलेले महापालिकेचे कर्मचारी साहित्य घेऊन बाहेर आले असून जेसीबीही रवाना झाला आहे.