Canada Cam Basheer : कॅम बशीरला जूनमध्ये कॅनडामध्ये अटक, मुंबई बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कॅम बशीर नावाच्या आरोपीच्या नातेवाईकांचा डीएनए अहवाल कॅनडा इंटरपोलला पाठवला, ज्याने यावर्षी जून महिन्यात विमानतळावर एका व्यक्तीला पकडले होते. अटक करण्यात आलेली व्यक्ती २००२-०३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी असल्याचा संशय एजन्सींना आहे. कॅम बशीर सीबीआयच्या मोस्ट वॉन्टेड यादीत असून, त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे .. या वाँटेड दहशतवाद्याला चनेपरंबिल मोहम्मद बशीर असेही म्हणतात, तो कॅनडामधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता तेव्हा तेथील एजन्सीने त्याला विमानतळावरून ताब्यात घेतले आणि ही माहिती भारतीय एजन्सीला देण्यात आली.