Baramati Protest: जातीनिहाय जनगणनेसाठी भारत बंदची हाक ABP Majha
बामसेफ आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने आज भारत बंदची हाक देण्यात आलीय. जातीनिहाय जनगणना करावी, जुनी पेन्शन योजना सुरु करावी यासह विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला बारामतीमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय. बारामतीमधील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभाग नोंदवला..