Fisheries, Rahuri | राहुरीतील तरुणांची मत्स्यपालन व्यवसायात भरारी, मासे थेट दक्षिण आफ्रिकेत
Continues below advertisement
शिक्षण पूर्ण केल्यावर तरुण नोकरीच्या शोधात वणवण फिरताना दिसतात. मात्र, राहुरी तालुक्यातील युवकांनी एकत्र येत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आणि आज तीन वर्षांनंतर निर्यातदाराच्या माध्यमातून चिलापी जातीचे मासे थेट निर्यात होत असून अहमदनगर जिल्ह्यातील मासे दक्षिण आफ्रिकेला रवाना झालेत. 150 टन मासे विक्रीतून 80 ते 90 रुपये प्रतिकिलो भावानुसार सुमारे साडे बारा लाख रुपये एकूण उत्पन्न मिळणार असून खर्च वजा जाता निव्वळ नफा 5 लाख रुपये होणार आहे.
Continues below advertisement