Cabinet Meeting : आजच्या बैठकीत कोणत्या निर्णयांवर पाऊस पडणार?

Continues below advertisement

Cabinet Meeting : आजच्या बैठकीत कोणत्या निर्णयांवर पाऊस पडणार?  

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election)  झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election)  वेध लागले आहेत.   राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत.  कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. पण आचारसंहिता कधीपासून लागू होईल यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  येत्या दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता  आहे.

विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते.  उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान  झाल्या असून    सुट्टीच्या दिवशीही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.   रविवारी सुट्टी असतानाही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे.   आज पुन्हा सकाळीच साडेनऊ वाजता बोलावली मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची  शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram