Cabinet Expansion Special Report : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 45% यंग ब्रिगेड
Cabinet Expansion Special Report : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात 45% यंग ब्रिगेड
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल (16 डिसेंबर) नागपूरमधील (Nagpur) राजभवन येथे संपन्न झाला. महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 12 खाती येणार आहे. शिवसेनेला कोणते 12 खाती मिळणार, याची यादी 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. शिवसेनेला 12 खाती मिळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नगरविकास खाते मिळणार आहे. तर गृहनिर्माण, उद्योग, पर्यटन ही महत्वाची खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. तसेच आरोग्य, शालेय शिक्षण खातेही शिवसेनेकडेच कायम राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम(सा.उपक्रम वगळून ),पाणीपुरवठा खातंही शिवसेनेकडेच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. जल संधारण,मराठी भाषा,खणीकर्म,माजी सैनिक कल्याण खातीही शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सुरुवातीपासून गृहमंत्री खातं शिवसेनेच्या वाट्याला यावं, यासाठी आग्रही होते. परंतु गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. गृह खात्याऐवजी नगर विकास आणि गृहनिर्माण शिवसेनेला देण्यात आले आहे.