Cabinet Expansion Meeting : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक; खातेवाटपाबद्दल काय ठरलं?

Continues below advertisement

Cabinet Expansion Meeting : मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक; खातेवाटपाबद्दल...

Maharashtra Politicis : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात रात्री उशीरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक तब्बल तीन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. मात्र, वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार दाखल झाले होते. तर एक तास आगोदरच मिटिंग संपवून ते आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार एक तास 23 मिनिटे बैठकीला हजर 

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच खाते वाटपासंदर्भातही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार हे एक तास उशिरा पोहोचले आणि एक तास आगोदर मिटिंग संपवून आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक तास 23 मिनिटे बैठकीला हजर होते. अजित पवार गेल्यानंतर एक तासानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर या निवासस्थानी रवाना झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 11 वाजून 12 मिनिटांनी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. तर 2 वाजून 9 मिनिटांनी वर्षा निवासस्थानाबाहेर पडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर 12 वाजून 3 मिनिटांनी दाखल झाले आणि 1 वाजून 26 मिनिटांनी वर्षा निवासस्थानावरून देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. एक तास अगोदर आणि एक तास नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram