Cab Companies : कॅब कंपन्या ग्राहकांची माहिती विकतात? सर्फशार्क कंपनीचा धक्कादायक अहवाल

कोरोनाकाळात मोबाईल क्लिकवर सुविधा मिळवण्याकडे नागरिकांचा कल वाढला आणि त्यामुळेच अॅप बेस्ड कॅब कंपन्यांचा भावही वधारला. मात्र उत्तम सेवेच्या नावाखाली तुमची वैयक्तिक माहिती मिळवणाऱ्या या कॅब कंपन्यांकडे तुमची माहिती खरंच सुरक्षित आहे का? हा प्रश्न आहे. कारण या कॅब कंपन्या तुमची माहिती थर्ड पार्टीला विकतात असा अहवाल सायबर सिक्युरिटी कंपनी 'सर्फशार्क'नं दिलाय. हा डेटा विकून कॅब कंपन्या मालामाल होतात आणि जाहिराती करणाऱ्या कंपन्यांकडे तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता असी माहिती पोहोचते असं सर्फशार्कचं म्हणणं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola