CAA | सीएएविरोधी ठराव मंजूर करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामसभा | ABP Majha
देशभर अनेक ठिकाणी CAA, NRC कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसतोय. अशातच अहमदनगर मध्ये चक्क नागरिकत्व कायद्याला विरोध करणारा ठराव ग्रामसभेत मंजूर केलाय. अहमदनगर मधील इसळक या गावात 26 जानेवारीला हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आलाय. विशेष म्हणजे CAA,NRC,NPR विरोधात ठराव करणारी देशातील ही पहिली ग्रामसभा आहे. इसळक गावात अनेक अशिक्षित तसेच आदिवासी लोक राहतात.