Bulli bai app case : बुली बाई अ‍ॅपची संशयित ऑपरेटर ताब्यात,महिलांच्या बदनामी मागे महिलेचा हात

दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडवणारं बुली बाई अॅपमधून मुस्लिम महिलांना बदनाम करण्यामागे एका महिलेचाच हात असल्याचं समोर आलंय. मुंबई पोलिसांनी एका संशयित तरुणीला अटक केली आहे. आरोपी श्वेता सिंह ही अवघी १८ वर्षांची तरुणी असून तिनं बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेय. काल बंगळूरूमधून मुंबई पोलिसांनी विशाल कुमार झा या २१ वर्षीय तरुणाला अटक केली होती. त्यानं दिलेल्या माहितीवरून मुंबई पोलिसांच्या एका टीमनं उत्तराखंडच्या रुद्रापूरमध्ये जाऊन श्वेता सिंह हिला ताब्यात घेतलंय. श्वेता सिंह हीनं बुली बाई अॅप बनवल्याचा पोलिसांना संशय आहे.  श्वेता तिच्या 'जट्टखालसा07' या ट्विटर हँडलवरूनही आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो ट्वीट करत होती अशी माहिती पोलिसांनी दिलेय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola