Buldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटना
Continues below advertisement
Buldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या काही गावातील नागरिकांना अचानक डोके खाजवणे व त्यानंतर तीनच दिवसात डोक्यावरील सर्व केस गळून पडल्याने टक्कल होणे. अशा विचित्र आजाराने ग्रासले असल्याने या परिसरात आता भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे 13 लोकांना तर कठोरा येथील 07 लोकांना पूर्ण टक्कल पडल्याचं समोर आलं आहे. नेमका हा काय आजार आहे..? याबद्दल अद्यापही आरोग्य विभागाला समजलं नाही. तरी मात्र या गावात आरोग्य पथक पोहोचल असून या परिसरातील गावात सर्वेक्षणाचे काम सुरू झालं आहे. या अचानक उद्भवलेल्या आजाराने मात्र या परिसरात भीतीच वातावरण उद्भवलं आहे.
Continues below advertisement