Buldana Rada : बुलढाण्याच्या चिखलित राडा, लग्नाच्या वरातीवर जमावाची दगडफेक

चिखली शहरातील सैलानी नगर परिसरातून एक लग्नाची मिरवणूक जात असताना डी जे वर आक्षेपार्ह गाणे का वाजवताय ..? ते गाणे बंद करा अस विचारून एका जमावाने या लग्नातील वरहाड्यांवर दगडफेक केली. यातून दोन्ही गटात तुफान राडा झाला वेळीच पोलीस पोचल्याने पोलिसांनी दंगेखोरांवर लाठी चार्ज केला दगडफेकीत व लाठी चार्जमध्ये जवळपास 13 लोक जखमी झालेले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास 30 लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलिसांनी आज दिवसभर कोंबिंग ऑपरेशन राबवून 15 जणांना अटक केली आहे दरम्यान थोड्याच वेळापूर्वी चिखलीच्या आ. श्वेता महाले ,  शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड व बुलढाण्याचे खा .प्रतापराव जाधव यांनी या परिसराला भेट देऊन नागरिकांना शांततेचा आवाहन केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola