Buldhana : पूर्णा नदीवरील पुलाचं काम अजूनही अपुर्ण,अपघात वाढल्यानं ग्रामस्थ संतापले : ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नांदेड-बुऱ्हाणपूर महामार्गावरील पूर्णा नदीवरचं बांधकाम अपूर्ण असल्यानं महामार्गालगतच्या खिरोडा गावच्या ग्रामस्थांनी हा पूलच अडवून धरला. या पुलाचं बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे इथे वारंवार अपघात घडत आहेत. इगल कन्स्ट्रक्शन कंपनीनं २०१७ सालापासून अपूर्ण असलेल्या या पुलावरून तशीच वाहतूक सुरू असल्यानं अपघांतांचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे संतापून ग्रामस्थांनी हा पूल बंद पाडलाय. या रस्त्याचा ठेकेदार हा "मी गडकरींचा माणूस आहे, आणि माझं कोणीही काहीच बिघडू शकत नाही" अशी धमकी गावकऱ्यांना देत असल्याचं गावच्या संरपंचानी सांगितलंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News