Buldhana Murthy : सिंदखेड राजामध्ये सापडलेल्या मूर्ती हलवण्यास स्थानिकांचा विरोध

Continues below advertisement

Buldhana Murthy : सिंदखेड राजामध्ये सापडलेल्या मुर्ती हलवण्यास स्थानिकांचा विरोध  ारतीय पुरातत्व विभागाने ही मूर्ती कुठे जतन करून ठेवायची किंवा कुठे दाखवण्यासाठी ठेवायची याबद्दल अद्यापही कुट निर्णय घेतलेला नाही मूर्ती काढल्यानंतर अजून या मूर्तीच्या परिसरात काही मंदिर किंवा मुर्त्या आहेत का याबाबत संशोधन सुरू राहील आगामी अनेक महिने हे संशोधन सुरू राहील त्यामुळे ही मूर्ती कुठे ठेवायची किंवा कुठे न्यायची याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही वरिष्ठ जे निर्णय घेतील तो अंतिम असेल अशी प्रतिक्रिया भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी अरुण मलिक यांनी दिली आहे त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी... परिसरातील नागरिकांना माहिती मिळाली की ही मूर्ती नागपूरला घेऊन जाणार आहे त्यामुळे परिसरातील या मूर्तीला नागपूरला नेण्यापासून विरोध करण्यासाठी राजे लखोजी जाधव यांच्या समाधी परिसरात सिंदखेड राजा व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहे त्यामुळे पुरातत्व विभाग करत असलेल्या उत्खननासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram