Defender Car Row: दीड कोटींच्या गाडीवरून वाद, मालकानेच केला मोठा खुलासा
Continues below advertisement
बुलडाण्यातील (Buldhana) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) दीड कोटींच्या डिफेंडर (Defender) गाडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी ही गाडी गायकवाड यांना कमिशन म्हणून मिळाल्याचा आरोप केला होता, ज्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला. त्यावर गाडीचे मालक निलेश ढवळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, 'कोणत्याच प्रकारचे कमिशन दिले नाही आणि सध्या कोणतेही टेंडर नाही त्यामुळे कमिशनचा प्रश्नच उद्भवत नाही'. ही कार आपण कर्ज काढून मुलाच्या आग्रहाखातर घेतली असून, केवळ काही दिवसांसाठी आमदार गायकवाड यांना वापरायला दिली आहे, असे ढवळे यांनी सांगितले. आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आमदार गायकवाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement