
Rajmata Jijabai Birth Anniversary | राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव; सिंदखेडराजा परिसरात जमावबंदी आदेश
Continues below advertisement
बुलढाण्यातील सिंदखेडराजा इथे जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज सकाळपासूनच जन्मोत्सव कार्यक्रम सुरु झाला आहे.आज सूर्योदयापूर्वी इथल्या ऐतिहासिक राजवाड्यात पुरातत्व विभागाच्या वतीने शासकीय महापूजा बुलढाण्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाली. सिंदखेडराजा इथल्या जिजाऊं सृष्टीमध्ये मराठा सेवा संघाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
Jijabai Birth Anniversary Birthday Anniversary Of Jijabai Buldhana News Rajmata Jijabai Sindkhedraja