Buldhana : बुलढाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू, कर्नाटकात Hijab वाद, महाराष्ट्रात पडसाद : ABP Majha
बुलढाणा शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. कर्नाटकात एका शैक्षणिक संस्थेकडून मुस्लीम मुलींच्या हिजाबवर बंदी घालण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी बुलढाणा शहरात आज मोर्चा, निदर्शने आणि आंदोलनाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.