Bundhana : बुलडाण्यात मिशन कवच कुंडल सुरू; लसीकरण वाहनाने होणार शहरात नागरीकांचे लसीकरण
देशासह राज्यातही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोना लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. घटस्थापनेच्या दिवशी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी 'मिशन कवच कुंडलं' (Mission Kavach Kundal)ची घोषणा केली आहे. दसऱ्यापर्यंत देशभरात 100 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यही प्रयत्नशील आहे. राज्यात दररोज 15 लाख लोकांना लस देण्याचं उद्दीष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडे 1 कोटी लशींचा साठा असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. बुलढाणा जिल्ह्यात देखली या 'मिशन कवच कुंडलं'चं पालन करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी या मोहिमेला हिरवा कंदील दाखवला. मिशन कवच कुंडलं द्वारे लसीकरण वाहनाने शहरात वेगवेगळ्या भागात नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार आहे.