Buldhana : ST Bus आणि Truck चा भीषण अपघात, दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू, तर 18 प्रवासी जखमी
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा इथं बायपास मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटीची एक बाजू कापली गेली. या दुर्घटनेत एक वृद्ध महिला जागीच ठार झाली तर १८ प्रवासी जखमी झालेत. त्यातील ६ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.
Continues below advertisement