Buldhana | अबब...! कधी पाहिला का? तब्बल 9 किलोचा 'मुळा'
निसर्गाबरोबर आताच्या संकरित बियाण्यांमध्ये कशाचीच शाश्वती देता येत नाही आणि यातच बऱ्याचदा नवनवीन आश्चर्याच्या गोष्टी पाहायला मिळतात. आता तुम्हाला विचार पडला असेल की असं काय नवल घडलं. तर हो नवलच घडलं. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेल्या ग्राम गोत्रा येथील भगवान रंगनाथ मुंडे हे शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात आणि त्यातच त्यांच्या शेतात तब्बल 9 किलोचा आणि अडीच फूट लांबीचा मुळा सापडला आहे. हा मुळा पाहण्यासाठी गावातील नागरिक उत्सुकतेने पाहायला जात आहेत.