Pune Land Deal: 'नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहार रद्द', बिल्डर Vishal Gokhale यांचा मोठा निर्णय

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट (Jain Boarding Trust) आणि बिल्डर विशाल गोखले (Vishal Gokhale) यांच्यातील वादग्रस्त जागा व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. 'नैतिकतेच्या मुद्द्यावर आणि जैन धर्मियांच्या भावना दुखावू नयेत म्हणून व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला', असे विशाल गोखले यांनी म्हटले आहे. गोखले यांनी ईमेलद्वारे हा निर्णय जैन ट्रस्टला कळवला असून, धर्मदाय आयुक्तालयालाही (Charity Commissioner) याबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच, त्यांनी व्यवहारापोटी दिलेले २३० कोटी रुपये परत करण्याची विनंती केली आहे. जैन समाजाच्या तीव्र विरोधामुळे आणि राजकीय हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. आता हा व्यवहार पूर्णपणे रद्द होऊन ट्रस्टची जागा पूर्ववत नावावर करण्याची मागणी जोर धरत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola