Divyang Assault Case: दिव्यांग विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, संस्थेवर फौजदारी कारवाईचे आदेश
Continues below advertisement
मतीमंद विद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी तक्रारदार प्रीतम घंगाळे यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, त्यांनी हा व्हिडिओ संस्थेतीलच एका कर्मचाऱ्याने दिल्याचे उघड केले आहे. 'हा व्हिडिओ बघितल्याबरोबर मला खूप हळहळ झाली की अशा दिव्यांग विद्यार्थ्याला हे अमानुषपणे मारहाण झालेली हे मला सहन झालं नाही,' असे तक्रारदार प्रीतम घंगाळे यांनी म्हटले आहे. या घटनेची तक्रार २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सचिव तुकाराम मुंढे, दिव्यांग कल्याण आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर, दिव्यांग महामंडळाच्या चौकशीअंती संबंधित संस्थेवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश चिकलठाणा पोलिसांना देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली आहे. त्यानुसार, मांडकी गोपाळपूर येथील चैतन्य कालेपनाथ मतिमंद विद्यालयाच्या अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement