Govardhan Asrani : 'असरानी यांचं निधन, तीन पिढ्यांना हसवणारा तारा हरपला'

Continues below advertisement
ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तीन पिढ्यांना हसवणारा हा दिग्गज कलाकार ८४ व्या वर्षी आपल्यातून निघून गेला. 'असरानी हा चेहरा अगदी अबालवृद्धांना माहिती असलेला चेहरा आहे,' असं ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी सांगितलं. सत्तरच्या दशकात फिल्म इन्स्टिट्यूटमधून आलेल्या असरानी यांनी विनोदाचं उत्तम टायमिंग आणि विविध दिग्दर्शकांचा विश्वास संपादन केला. 'शोले' मधील त्यांचा परफॉर्मन्स आजही सर्वज्ञ आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनातही पाऊल टाकलं आणि हिंदी, गुजराती, मराठी चित्रपटांत आपली छाप सोडली. राजेश खन्नासोबत अनेक चित्रपटांत त्यांची जोडी गाजली. त्यांच्या जाण्याने एक लख्खतातारा हरपल्याची भावना सर्वत्र आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola