Sai Baba | साईंच्या जन्मस्थळावरील वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक | ABP Majha

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. काल संध्याकाळी शिर्डीत पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांना आज चर्चेसाठी बोलावलं आहे. शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिक आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. या चर्चेत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिला आहे. तसेच आज शिर्डीकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला जाणार असले, तरी पाथरीकरांना मात्र आजच्या चर्चेचं निमंत्रण नसल्याचं आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola