IT Act Amendment ला सोशल मीडिया कंपन्यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर मुंबई हायकोर्टात निकालाची शक्यता
Continues below advertisement
IT Act Amendment ला सोशल मीडिया कंपन्यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर मुंबई हायकोर्टात निकालाची शक्यता
आयटी कायद्यातील सुधारणेला सोशल मीडिया कंपन्यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात निकाल अपेक्षित आहे. केंद्र सरकारने 6 एप्रिल 2023 रोजी माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 मध्ये सुधारणा करून सरकारशी सबंधित बनावट, खोटी किंवा दिशाभूल करणा-या मजकुरासाठी संबंधित युजर्ससोबत कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात आलंय.. याविरोधात सोशल मीडिया कंपन्यांनी कोर्टात धाव घेतली. याआधी समाज माध्यमांवरून प्रसिद्ध होणा-या मजकुरासाठी या कंपन्यांना जबाबदार धरलं जात नव्हते. त्यामुळे कायद्यातील नवी दुरूस्ती थेट नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा आरोप करत कुणाल कामरासह काही माध्यमांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम फैसला येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Bombay High Court