Lockdown Maharashtra : राज्यात कडकडीत लॉकडाऊन हवाच, मुंबई उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला सूचना
मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यामुळे 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासाठी शासनाच्या वतीनं नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.