Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं
Bombay High Court on Hijab : हिजाब बंदीविरोधात विद्यार्थीनीने दिलेलं आव्हान कोर्टाने फेटाळलं
महाविद्यालयातील 'हिजाब बंदी' योग्यच
चेंबूरच्या आचार्य-मराठे कॉलेजनं ड्रेसकोडच्या माध्यमातून लागू केलीय हिजाबवर बंदी
हिजाब बंदीला नऊ विद्यार्थिनींनी दिलंय मुंबई उच्च न्यायालयात दिलेलं आव्हान फेटाळलं
हिजाब बंदी धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचा याचिकेतून दावा
मात्र याचिकेतील आरोपांच कॉलेजकडून हायकोर्टात जोरदार खंडन
कुठल्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही - कॉलेज
Mumbai Hijab Ban In College : काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्या बुरखा बंदीच्या वादानंतर आता मुंबईतही (Mumbai News) असाच वाद निर्माण होतोय का, असे चित्र निर्माण झाले आहे. मुंबईतील चेंबूर (Chembur) भागात आचार्य महाविद्यालयात गणवेश सक्ती आणि बुरखा बंदी ( Hijab Ban) करण्यात आली आहे. त्यानंतर महाविद्यालयात बुरखा परिधान करुन येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कॉलेज प्रशासन बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थ्यांना परवानगी देणार नाही यावर ठाम असल्याची माहिती आहे. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आता कोर्टाने एका विद्यार्थीनीची याचिका फेटाळली आहे.