BMC Polls: निवडणुकीनंतर राऊतांना संन्यास घ्यावा लागेल, राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Elections) जागावाटपावरून महायुतीमधील (Mahayuti) संभाव्य मतभेदांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'भारतीय जनता पक्ष पन्नास, एकनाथ शिंदे गट एकशेवीस आणि अजित पवार शंभर जागा जिंकतील, मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन केदारनाथला जावं लागेल', असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला. यावर नवनाथ बन यांनी, 'मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही, तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि राजकीय संन्यास घ्यावा लागेल' असे सडेतोड उत्तर दिले. मुंबईकर महायुतीच्याच बाजूने कौल देतील, असा विश्वासही बन यांनी व्यक्त केला. ठाकरे बंधूंचाच महापौर होईल, या राऊतांच्या विधानामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola