Eknath Shinde Shivsena : मनपासाठी एकनाथ शिंदेंची मोर्चेबांधणी, कोणत्या आधारे देणार तिकीट?

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत सर्वे सुरू केलेले आहेत. शिवसेनेत येईल त्याला प्रवेश दिला जात असल्याने अनेक वॉर्डांमध्ये 'जागा एक आणि इच्छुक अनेक' अशी अवस्था झाली आहे. निवडून येऊ शकतात अशांनाच प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते. पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन 110 ते 114 जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव शिवसेनेकडून ठेवला जाण्याची शक्यता आहे. सत्तांतरणानंतर शिंदेंच्या शिवसेनेत 2017 ते 2022 या कालावधीतले 62 नगरसेवक आणि 2017 पूर्वीचे 65 माजी नगरसेवक दाखल झाले आहेत. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे 23 माजी नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 नगरसेवक, काँग्रेसचे 7, मनसेचे 1, सपाचे 2, एमआयएमचे 2 माजी नगरसेवक शिंदेंसोबत आहेत. 2017 पूर्वीचे शिवसेनेचे 32, भाजपाचे 2, काँग्रेसचे 19, राष्ट्रवादीचे 2, मनसेचे 6, सपाचे 1 आणि 3 अपक्षही शिंदेंसह आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईत मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola