BMC Elections: 'आम्ही स्वतंत्र लढणार', Vijay Wadettiwar यांचा स्वबळाचा नारा; काँग्रेसमध्ये समन्वयाचा अभाव?
Continues below advertisement
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईची निवडणूक काँग्रेस एकटी लढवेल, असे जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वडेट्टीवार म्हणाले, 'आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलंय की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कुणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही'. विशेष म्हणजे, मुंबई काँग्रेसच्या एकाही नेत्याने वडेट्टीवारांच्या या घोषणेशी अद्याप सहमती दर्शवलेली नाही. तर दुसरीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणुका जाहीर झाल्यावरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सांगून संभ्रमात आणखी भर टाकली आहे. या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) समन्वयाचा अभाव आणि काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement