BMC Elections 2025: मुंबई महापालिकेसाठी २८ नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर होणार

Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या २२७ जागांसाठी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 'अंतिम आरक्षण २८ नोव्हेंबर २०२५ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल', असे आयोगाच्या वेळापत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार, १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या काळात नागरिकांना हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत. त्यानंतर २१ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयुक्त या हरकती व सूचनांवर विचार करून आपला निर्णय देतील. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण यादी जाहीर केली जाणार असल्याने सर्व राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष या तारखेकडे लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola