Remdesivir Injection Black Market | नांदेड येथे रेमडिसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार; चार जणांना अटक

Continues below advertisement

नांदेड : कोरोना रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडिसिवीर इंजेक्शन 100 एमजी चा काळाबाजार करणाऱ्या चौघांना 7 रेमडिसिवीर इंजेक्शनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने कोरोनावर अत्यावश्यक असणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी वाढली याचा फायदा घेत काही औषध विक्रेत्यांनी ज्यादा दराने दाम दुप्पट किमतीत रेमडिसिवीर इंजेक्शन विकत आहेत.तर काहींनी हे इंजेक्शन विकण्यासाठी औषध विक्रेत्यांचे रॅकेट तयार केले आहे. हे रॅकेट गरजू रुग्णांचा नातेवाईकांना हेरून अडवणूक करून जास्त भावाने रेमडिसिव्हर इंजेक्शन विक्री होत होती. याविषयी जिल्हाधिकारी व अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप  कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.त्यामुळे सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होता.दरम्यान नांदेड येथील शिवसैनिक गौतम जैन यांच्या नातेवाईकांना रेमडिसिवीर इंजेक्शन 100 एमजी ची आवश्यकता होती.या औषधांची मूळ किंमत 5 हजार 400 रुपये असताना विक्री करणारा 8 हजार रुपये दराने औषधी देत होता.सदर बाब पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना निदर्शनास आणून दिली.त्यानुसार  स्थानिक गुन्हे शाखेने  कार्यवाही करत वीरभद्र स्वामी,गोकुलनगर नांदेड ,बाबाराव पडोळे हिंदुस्थान मेडिकल वाजेगाव,बालाजी धोंडे मनस्वी एजन्सी संजीवनी हॉस्पिटल,विश्वजित कांबळे व्यवसाय एमआर अशा चार व्यक्तींन वर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram