Black Magic Kolhapur : 'निवडणुकीत भोंदूगिरी वाढते, बळी पडू नका', अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन

Continues below advertisement
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Elections) पार्श्वभूमीवर भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार वाढले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंवर खेळे मारून किंवा लिंबू कापून करणी करण्याचे प्रकार समोर येत असून, स्मशानभूमीत अघोरी पूजा केली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmulan Samiti) याविरोधात आवाज उठवला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसुरकर (Geeta Hasurkar) यांनी म्हटले आहे की, 'निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या भोंदू, बुवाबाबांचे पेव फुटत आहेत आणि हे समाजाला वेटीस धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे भोंदू, बुवाबाबा करत आहेत, तर मी आवाहन करते की अशा कुठल्याही भोंदू, बुवाबाबांना आपण समाजाने बळी पडू नये.' या प्रकारांमुळे लहान मुले आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून, सुशिक्षित कोल्हापूरला हे लांच्छनास्पद असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola