मराठी बांधवांचा समंजसपणा, कन्नडिगांचा धुडगूस, काळा दिन शांततेत, कर्नाटक दिन तणावात | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकारची मराठी भाषिक बांधवांवर दमदाटी सुरुच आहे. मराठी भाषिकांनी उद्या अंगावर एकही काळा कपडा घालू नये, असं फर्मान कर्नाटक सरकारनं काढलं आहे.
Continues below advertisement