Mega Recruitment | मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली : चंद्रकांत पाटील | ABP Majha
Continues below advertisement
विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, अशी स्पष्ट कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर सुधीर मुनगंटीवारही मैदानात उतरले आहेत. त्यांनी मेगाभरती गरजेची आहे असं सांगितलं. पण त्याचवेळी जुन्या नेत्यांचा अपमान होऊ नये अशी भूमिकाही घेतली. भाजपची मेगाभरती ही चूक असल्याची कबुली आजपर्यंत भाजपच्या कुणीही दिली नव्हती. पण आता खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच कबुली दिल्याने भाजपमध्ये आयात झालेल्या लोकांचं काय होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
Continues below advertisement