Sada Sarvankar on Amit Thackeray : मी माहीममधून लढणारच, राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही,
Sada Sarvankar on Amit Thackeray : राज ठाकरेंचा पक्ष महायुतीत नाही, मी माहीममधून लढणारच
माहीम मतदारसंघात शिवसेना पक्ष जिवंत ठेवण्यासाठी या भागातून विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाचा उमेदवार लढणे आवश्यक आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी केले. पक्ष आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी नेत्यांना असे निर्णय घ्यावे लागतात. मी गेल्या 15 वर्षांपासून दादर भागात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या भागात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची जनता राहते. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचा उमेदवार न देऊन येथील शाखांचं आणि कार्यकर्त्यांचं काय करायचं, हा प्रश्न आहे. त्यामुळे मला माहीम विधानसभेतून (Mahim Vidhan Sabha constituency) लढणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रामदास आठवले साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळे करत असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.