BJP Protest : 'ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात', Navnath Ban यांचा पलटवार

Continues below advertisement
भाजप कार्यकर्त्यांवर (BJP workers) गुन्हे दाखल झाल्यानंतर पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी हे मोर्चा नसून केवळ एक आंदोलन होते, असे म्हटले आहे. 'ज्यांनी त्रास दिला त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतात,' असे सांगत बन यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली. आमच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही किंवा वाहतूक कोंडीही झाली नाही, असा दावाही त्यांनी केला. एका कोपऱ्यात बसून शांततेत आंदोलन सुरू होते, असे स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola