Maharashtra : नगररचना पद भरतीच्या जाहिरातीवरून वादंग, राज्यातील रहिवासीची अट काढल्याचा आरोप
Continues below advertisement
नगरविकास खात्याच्या नगररचना पद भरतीच्या जाहिरातीवरुन भाजप आक्रमक झालीय... जाहिरातीत उमेदवार राज्यातील रहिवासी असावा, ही अट काढल्यानं आता भाजपनं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलंय. महाभकास आघाडीचं मराठी प्रेम बेगडी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकरांनी केलीय... 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात ही अट होती ती का वगळली याचे उत्तर सरकारने द्यावे अन्यथा ही अट पूर्णस्थापित करा अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिलाय.
Continues below advertisement