BJP vs Congress on George Soros : सोरॉस यांच्यासोबत लागेबांधे असल्याचा भाजपचा काँग्रेसवर आरोप

Continues below advertisement

Who Is George Soros : 1940 च्या दशकात हंगेरीमध्ये ज्यूंचे नरसंहार सुरू होतं आणि त्यावेळी एका 8 वर्षाच्या मुलाने आपली ज्यू धर्मीय ओळख लपवण्यासाठी खोटं ओळखपत्र तयार केलं. त्यानंतर हा मुलगा लंडनला आला आणि रेल्वे स्टेशनवर हमाल, हॉटेलमध्ये वेटरचे अशी मिळेल ती कामं करू लागला. मोठ्या संघर्षानंतर त्याचं नाव जगातल्या टॉप श्रीमंतांच्या यादीत आलं. 93 वर्षाच्या या व्यक्तीचं नाव आहे जॉर्ज सोरोस (George Soros). ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्याचं कारण म्हणजे OCCRP या संस्थेने अदानी समूहावर ((Gautam Adani)) केलेले आरोप. अदानी समूहाने मात्र यासंबंधित एक निवेदन जारी करुन हे सर्व आरोप फेटाळले आहेत.  

हिंडनबर्गच्या अहवालानंतर आता पुन्हा जवळपास आठ महिन्यानंतर अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संबंधित अहवाल जारी करणाऱ्या संस्थेचं नाव आहे दी ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (The Organised Crime and Corruption Reporting Project - OCCRP). या सस्थेला फंड दिला जातोय तो अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याकडून. 

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसा जॉर्ज सोरोस यांची एकूण संपत्ती ही 7.16 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सध्याचा विचार करता ते जगातल्या पहिल्या 350 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram