ABP News

Maharashtra Politics | एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची मुंबईत भेट होण्याची चर्चा

Continues below advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच मोठा निर्णय घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर ही भेट झालीच तर यानंतर काय होणार याची उत्सुकता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram