Voter List Row: 'राजकीय पक्षांना मजा मारायची आहे का?',Mungantiwar यांचा संविधानावरून सवाल
Continues below advertisement
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) आणि मतदार याद्यांमधील (Voter Lists) घोळावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. ‘आम्हाला फक्त मजा मारायची आहे काय, राजकीय पक्ष म्हणून काही कर्तव्य नाही का? संविधान फक्त अधिकार देतं, जबाबदारी नाही का?’, असा थेट सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश दिले असून, निवडणुका न झाल्याने वित्त आयोगाकडून येणारा अंदाजे ३ ते ४ हजार कोटींचा निधी अडकल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदार याद्या दोषरहित करण्याची जबाबदारी राजकीय पक्षांची असून, त्यांनी बूथ लेव्हल एजंट नेमून काम करायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं. निवडणुका तोंडावर आल्यावर भाजप (BJP) किंवा इतर पक्षांनी आता शंका उपस्थित करण्यात अर्थ नाही, असे म्हणत त्यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement