Ravindra Chavan Speech : 'परकीय निधीतून काही NGO देश अस्थिर करतायत', गंभीर आरोप
Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मुंबईतील (Mumbai) मूक आंदोलनादरम्यान (Silent Protest) विरोधकांवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना त्यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मोर्चाला दिशाभूल करणारे म्हटले. चव्हाण म्हणाले, 'काही एनजीओस (NGOs) मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून देशामध्ये अशा काही मंडळींना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत'. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीडीडी चाळीच्या (BDD Chawl) पुनर्विकासात ५०० स्क्वेअर फुटांची घरे आणि मराठवाडा ग्रीड (Marathwada Grid) सारख्या योजनांमुळे राज्याचा विकास होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात एफडीआय (FDI) गुंतवणूक वाढण्यामागे फडणवीसांचे दूरदृष्टी नेतृत्व असल्याचे चव्हाण म्हणाले. त्यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणाचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. हा मोर्चा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा कट असून तो हाणून पाडण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement