Ravindra Chavan on Sanjay Raut : राऊतांवर बोलण्यासाठी राजकारणात नाही; चव्हाणांचा टोला

Continues below advertisement
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी सोलापूरमध्ये (Solapur) चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावर भाष्य करतानाच संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही प्रत्युत्तर दिले आहे. 'ते काय बोलतात त्याच्यावरती भाष्य करण्यासाठी मी राजकारणात नाही,' असं म्हणत रवींद्र चव्हाणांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकारमुळे विकास होत असून, याच विकासाच्या प्रभावामुळे अनेक लोकप्रतिनिधी भाजपमध्ये येत असल्याचे चव्हाण म्हणाले. राज्यात लवकरच महानगरपालिका निवडणुका (Municipal Elections) होणार असून, त्या अंतिम टप्प्यात होतील आणि त्यावेळचे निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola