Navnath Ban : पालिकेत भ्रमाचा भोपळ फुटणार, भाजपचं राऊतांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांच्यात मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीवरून शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'गद्दारीची भाषा करू नका, गद्दार कोण आहे हे जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला घरी बसवण्याचं काम केलंय,' असा थेट हल्लाबोल नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. राऊत यांनी मुंबई आणि ठाण्यात ठिकऱ्या उडवण्याचा इशारा दिल्यानंतर, बन यांनी पलटवार करत, ठिकऱ्या गद्दारांच्याच उडतील असं म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोपही बन यांनी केला. तसंच, घोटाळे करून निवडणूक यंत्रणा ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहू नका, जनताच गद्दारांच्या ठिकऱ्या उडवेल, असा इशारा त्यांनी दिला. बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यामुळेच विधानसभेत तुमच्या ठिकऱ्या उडाल्या आणि आता महापालिका निवडणुकीत भ्रमाचा भोपळा फुटेल, असंही बन म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement