Politics : सेनेतील अंतर्गत बंडाळी,रिफायनरी प्रकल्पावरून नाराजीचा फायदा उठवण्याचा भाजपचा मेगा प्लॅन!
Continues below advertisement
Politics : कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून गरमागरमी सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी लपून राहिलेली नाही.. मात्र या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी आता भाजपनं मेगाप्लॅन् बनवल्याचं कळतंय. कोकणातले नाराज शिवसेना नेते, आमदार गळाला लावण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.. आणि शिवसेनेचे दोन माजी मंत्री, विद्यमान आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची सूत्रांकडून माहिती मिळतेय. नाणारवरून उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेतल्यानं आधीच स्थानिक शिवसैनिक नाराज आहेत.. त्यांनाच गळाला लावून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खिंडार पाडण्याचा भाजपचा प्लॅन आहे.. यासाठी आशिष शेलार, प्रसाद लाड, नारायण राणे, निलेश राणे यांचे कोकणात दौरे, कार्यक्रम सुरू आहेत.
Continues below advertisement