Bogus Voters: 'तुमची बोबडी का वळली?', Ashish Shelar यांचा Raj आणि Uddhav Thackeray यांना थेट सवाल
Continues below advertisement
मुंबईतील दुबार मतदार (Bogus Voters) यादीवरून आता नवा वाद पेटला असून भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'राज ठाकरेजी, दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय?' असा सवाल आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. मुस्लिम नावातील दुबार मतदाराचा संदर्भ देत, अशा नावांवर ठाकरे बंधूंची बोबडी का वळली आहे, असेही ते म्हणाले. दुसरीकडे, बोगस मतदार कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो, त्याला राज ठाकरेंनी सांगितलेलीच वागणूक दिली जाईल, अशी भूमिका मनसेने स्पष्ट केली आहे. शेलार यांना भाजपमध्ये कोणी विचारत नसल्याने प्रसिद्धीसाठी ते हे सर्व करत असल्याची टीकाही होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement