Ashish Shelar PC : 'लाव रे तो व्हिडिओ' वोट जिहाद'वरून भाजप ठाकरेंवर आक्रमक

Continues below advertisement
भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दुबार मतदारांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेलार यांनी ठाकरे बंधू केवळ हिंदू आणि दलित आडनावाचे दुबार मतदार दाखवून मुस्लिम दुबार मतदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. 'हिंदू आणि दलित मतदार असेल तर त्याला फटका मारा आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा, हीच का तुमची भूमिका?', असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. त्यांनी कर्जत-जामखेड, साकोली, बीड, धारावी अशा अनेक मतदारसंघांतील मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी सादर केली. हा 'वोट जिहाद' असून, आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणूक यंत्रणेवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला. भाजपने मतदार यादी शुद्धीकरणासाठी 'Special Intensive Revision' (SIR) कार्यक्रमाला पाठिंबा दिला असून, मविआ आणि मनसेनेही त्याला समर्थन द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola