Ram Shinde | खडसेंपाठोपाठ राम शिंदे यांची नाराजी उघड; चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना टोला
विधानपरिषद उमेदवारीवरुन भाजपमधील नाराजीनाट्य काही संपायला नाव घेत नाही. याआधी एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. आता माजी मंत्री राम शिंदे यांनीही आपली नाराजी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये राम शिंदे यांनी चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे यांना टोला लगावला आहे.