Mumbai काही चर्चा उघड सांगायच्या नसतात,मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेवर असं का म्हणाले प्रवीण दरेकर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात 15 ते 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. पूरग्रस्तांना मदतीचा चेक दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. दरम्यान प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे.