BJP HQ Row: 'फाईलचा प्रवास राफेलच्या गतीने', Sanjay Raut यांच्या आरोपांनी खळबळ!

Continues below advertisement
केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या हस्ते Maharashtra BJP प्रदेश मुख्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्यावरून राजकीय वाद पेटला आहे. खासदार Sanjay Raut आणि आमदार Rohit Pawar यांनी या भूखंड व्यवहारावर गंभीर आरोप केले आहेत. 'या जागेसाठी फाईल ज्या पद्धतीनं वेगाने हल्ली, तो संपूर्ण प्रवास राफेलच्या गतीने झाला,' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर धोकादायक इमारत असल्याचे दाखवत भूखंड ताब्यात घेतल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. Sanjay Raut यांनी थेट Amit Shah यांना पत्र लिहून संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Nariman Point येथील भूखंडाची फाईल Eknath Realtors च्या नावे हस्तांतरित करण्यासाठी आणि नंतर भाजपला देण्यासाठी BMC अधिकाऱ्यांनी आश्चर्यकारक वेग दाखवल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. अवघ्या काही दिवसांत कोट्यवधी रुपयांच्या या भूखंडाचे सर्व व्यवहार पूर्ण झाल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola